हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री जनतेला संबोधित करताना विविध विषयांवर भाष्य केले. मुंबई लोकल प्रवासासाठी काही सूट देण्यात आली असून 15 ऑगस्ट पासून 2 डोस घेतलेल्या लोकांना लोकल प्रवासासाठी मुभा देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत हा भाजपचा विजय आहे असं म्हंटल आहे.
नितेश राणे यांनी ट्विट करत म्हंटल की, ये लगा सिक्सर… मुंबई भाजपच्या आंदोलनाला यश…येत्या 15 ऑगस्टपासून मुंबई लोकल सुरु होतीय… ‘दुनिया झुकती हैं, झुकानेवाला चाहिए!’, असं ट्विट करुन नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. हे ट्विट करताना त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, आमदार आशिष शेलार आणि मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांना टॅग केलं.
Ye laga sixer!!
Big victory for @BJP4Mumbai!!
Local train start from 15th August!!झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिये!!! @Dev_Fadnavis @mipravindarekar @PrasadLadInd @ShelarAshish @MPLodha
— nitesh rane (@NiteshNRane) August 8, 2021
दरम्यान कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर अनेक नियम शिथील करण्यात आले. मात्र, मुंबईची लोकल ट्रेन बंद होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून भाजप कडून सातत्याने मुंबई लोकल सुरु करण्याची मागणी होत होती. भाजपने यासाठी मुंबईत आंदोलन देखील केलं होतं.