हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुंबई भाजप प्रदेश कार्यालयाला आग (BJP Office Fire) लागली आहे. नरिमन पॉईंट येथील कार्यालयाला आग लागली आहे. किचनमध्ये वेल्डिंगचे काम सुरु असताना आग लागली असल्याचे बोललं जात आहे. या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र आगीमुळे संपूर्ण परिसरात धुराचे लॉट पाहायला मिळत आहे. अचानक लागलेल्या या आगीने खळबळ उडाली आहे.
दुपारी 4.35 च्या सुमारास लागली आग – BJP Office Fire
याबाबत अधिक माहिती अशी कि, नरीमन पॉइंट येथील भाजपच्या या कार्यालयाचं नुतनीकरणाचं काम सुरू होतं. त्याच दरम्यान दुपारी 4.35 च्या सुमारास किचनमध्ये वेल्डिंगचे काम सुरु असताना अचानक शॉर्ट सर्किट झाले आणि त्याचे रूपांतर आगीत झालं. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केलं. या आगीत ऑफिस मधील कागदपत्रे जळून खाक झाली. भीषण आगीमुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट वाहू लागले आणि परिसरात काळोख पसरल्यासारखं वातावरण झालं. आग लागल्यानंतर (BJP Office Fire) कार्यालयातील कर्मचारी हातातील काम टाकून बाहेर सैरावैरा पळू लागले. त्यामुळे कोणीही आतमध्ये अडकलं नाही. घटनेचं गांभीर्य बघून अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झालं असून आग वीजवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहेत.
भाजपचं हे कार्यालय नेहमी नेते आणि कार्यकर्त्यांनी भरलले असते. राज्यातील भाजपचे नेते याच कार्यालयात असतात. या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर मंत्रालयाचा परिसर आहे. त्यामुळे नेतेमंडळींना हे कार्यालय सोयीचं पडतं. परंतु आता रविवार असल्याने आणि पक्षाचा प्रचार असल्याने या कार्यालयात फारसे कोणी नव्हतं. फक्त सोशल मीडियाचे कर्मचारी आज भाजपच्या कार्यालयात होते त्यामुळे मोठा अनर्थ टळला.