ऑक्सिजनविना लोक मरतायत हीच कराडकरांची ओळख का? भाजपचा पृथ्वीराज चव्हाणांवर निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. गुरुवारी जिल्ह्यात ८२८ नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अपुरी पडत असून नागरिकांना जिल्ह्यात बेड शिल्लक नसल्याने इतर जिल्ह्यांत उपचाराकरता जावे लागत आहे. यावरुन आता सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष आणि भाजप नेते शेखर चरेगावकर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना लक्ष केले आहे. कराडमधून जे मुख्यमंत्री, पालकमंत्री झाले.  पिढ्यानपिढ्या या दोघांच्या घरात आमदारकी असतानाही कराडचे उपजिल्हा रुग्णालयाची कोविड सेंटर मान्यता रद्द झाली हीच कराडची ओळख म्हणायची का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

“कराडमधून मुख्यमंत्री झाले होते, त्यांच्या घरी पिढ्यानपिढ्या आमदारकी आहे. तर जिल्ह्याचे पालकमंत्री अनेक वर्षे मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. स्वातंत्र्यापासून या दोन कुटुंबांकडे सत्ता असताना देखील कराडच्या उपजिल्हा रुग्णालयाला कोविड सेंटरची मान्यता रद्द झाली ही केवढी मोठी शोकांतिका आहे. म्हणूनच आता यांच्या नाकर्तेपणाबद्दल सगळ्या जगाला माहित झाले असून मतदार संघातील लोकांनी आपण कसल्या लोकांना प्रतिनिधी केले आहे याचा विचार करण्याची गरज आहे.” असे म्हणत त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्यावर निशाणा साधला आहे. याबरोबरच दोन दोन जिल्हा रुग्णालये असताना त्यांना कोविडची मान्यता मिळत नाही यावरूनही त्यांनी सुनावले आहे.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/2739938699599124/

कराडमध्ये मृतदेह दहनासाठी १०-१२ तासांचा कालावधी लागत असल्याचेही त्यांनी सांगितले. हे सरकार संवेदनशीलता नसलेले सरकार आहे तसेच संवेदनशीलता नसणारे लोकप्रतिनिधी असल्याचे ते म्हणाले. कोविडच्या काळात राजकारण करण्यात काहीच अर्थ नाही आहे मात्र आरोग्यमंत्री स्वतः व्हीआयपी लोकांनी बेड अडवून ठेवले आहेत. मात्र पालकमंत्र्यांना मुंबईला नेवून व्हीआयपी बेड तुम्ही अडवला नाही का? असा प्रश्न त्यांनी केला.  एकूणच या सरकारमध्ये काहीच ताळमेळ नसून, कोण काय बोलतंय, कुणाचं काय सुरु आहे हे काहीच यांना माहित नाही असे ते म्हणाले आहेत. तसेच सोशल मीडियावरून सरकारचा गोंधळ दिसून येतो आहे असे ते म्हणाले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment