पंकजा मुंडेंना दुसऱ्यांदा कोरोना; जनतेला केलं ‘हे’ आवाहन

Pankaja Munde
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसात राज्यात कोरोना रुग्णवाढीत लक्षणीय वाढ झाली असून राजकीय नेत्यांनाही कोरोनाने गाठले आहे. त्यातच आता भाजप नेत्या पंकजा मुंडे याना कोरोनाची लागण झाली असून त्यांनी सर्वाना काळजी घेण्याचे आवाहन केलं आहे. विशेष म्हणजे पंकजा मुंडे याना यापूर्वी देखील कोरोनाची बाधा झाली होती

पंकजा मुंडे यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली. कोरोना बाधीत लोकांच्या संपर्कात आल्याचे जाणवल्या बरोबर मी विलग झाले आहे.. चाचणी केली…लक्षणं आणि Corona दोन्ही आहे… सर्वानी काळजी घ्यावी..असे आवाहन पंकजा यांनी केलं

राजकीय नेते कोरोनाच्या विळख्यात

दरम्यान, यापूर्वी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, खासदार सुप्रिया सुळे, बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे पाटील, अशा बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आत्तापर्यंत राज्यातील 10 मंत्र्यांचा आणि 20 आमदारांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती.