ओबीसी म्हणजे फक्त एकनाथ खडसे नाहीत ; प्रवीण दरेकरांचा खडसेंवर पलटवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्यानंतर ते पूर्वीचा पक्ष भाजप विरोधात खूपच आक्रमक झाले आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सतत वेगवेगळे आरोप करत आहेत.खडसेंच्या या आरोपाला भाजपकडून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी प्रत्युत्तर दिले आहे. एकनाथ खडसें यांनी देवेंद्र फडणवीसांचा द्वेष करणं बंद करावं असं प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे. ओबीसी म्हणजे एकनाथ खडसे नाहीत असंही ते म्हणाले आहेत.

“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ओबीसींसाठी जेवढं काम केलं तेवढं कोणीही केलं नाही. फडणवीस सरकारने अनेक प्रश्न मार्गी लावले. पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील ओबीसी समाजातूनच येतात पण आम्ही उल्लेख करत नाही. भाजपाला टार्गेट केलं जात असल्याने आम्हाला तो उल्लेख करावा लागतो,” असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

एकनाथ खडसेंनी फडणवीसांवर काय आरोप केले होते

“भाजपामध्ये देवेंद्र फडणवीसांनी छळले. मी फक्त फडणवीसांवर नाराज आहे. माझ्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल झाला. तो फडणवीसांनी करायला लावला याचा मनस्ताप झाला. या सर्व मानसिक छळामुळेच पक्षांतराचा निर्णय घेतला,” असं एकनाथ खडसे पक्ष सोडताना म्हणाले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment