सरकार आहे की सर्कस? जनता तुमच्या कोलांट्याउड्यांना त्रासलीय; दरेकरांची टीका

Darekar and Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | खासगी शाळांचे शिक्षणशुल्क १५ टक्के कमी करण्याचा निर्णय राज्यातील ठाकरे सरकारने घेतला होता. मात्र, काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपल्याच निर्णयाबाबतचा अध्यादेश काढायला सरकारने नकार दिला?”, असे म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

सरकार’ आहे की, ‘सर्कस’? १५ टक्के शिक्षण फी कपातीचा निर्णय पंधरवड्यापूर्वी घेतला. काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपल्याच निर्णयाबाबतचा अध्यादेश काढायला नकार दिला? जनता त्रासलीय तुमच्या या सर्कशीतल्या कोलांट उड्यांना! अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली.

एक काय तो ठाम निर्णय घ्या अन्यथा जन उद्रेक होईल! पालक आणि विद्यार्थी, तुमच्या या टोलवाटोलवीच्या धोरणामुळे त्रस्त झाले आहेत. जनतेची दिशाभूल करु नका, ठोस निर्णय घ्या, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.