हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे याना नितेश राणे यांच्या बद्दलच्या एका विधानांवरून पोलिसांनी नोटीस पाठवल्यांनंतर भाजप कडून मात्र राणेंना समर्थन दिले आहे. त्याचाच भाग म्हणून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राणेँबद्दल बोलताना जोपर्यंत ते राजकारणात आहेत तोपर्यंत त्यांचा राजकीय दरारा राहील असे म्हंटल आहे
नारायण राणेंची राजकीय दहशत कधीच नव्हती, असेल तर नारायण राणेंचा राजकीय दरारा निश्चितपणे होता. तो काल होता, आज आहे आणि जो पर्यंत राणे राजकारणात आहेत तो पर्यंत राजकीय दरारा निश्चित राहील. कारण त्यांनी ज्या ज्या ठिकाणी काम केलं त्याठिकाणी आपली छाप उमटवली अस म्हणत दरेकर यांनी राणेंच कौतुक केले. राज्याचा मंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून अभूतपूर्व कामगिरी केली. सहा महिनेच मुख्यमंत्री राहिले पण त्यांनी स्वत:ची छबी निर्माण केली. असेही दरेकरांनी म्हंटल.
दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील राणेंना पाठिंबा दर्शवला आहे. नारायण राणे यांना नोटीस पाठवणं हा हस्यास्पद प्रकार आहे असे म्हणत नारायण राणे हे सर्वांना पुरून उरणारे आहेत अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना इशारा दिला.