नाही तर मराठा आरक्षणासाठी आम्ही देखील उपोषणाला बसू ; प्रवीण दरेकरांचा ठाकरे सरकारला इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं असून विरोधी पक्ष भाजप कडून सत्ताधारी महाविकास आघाडीला घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, मराठा समाजाच्या आरक्षणावर लवकरात लवकर तोडगा काढा. नाही तर मराठा तरुणांबरोबर आम्हालाही उपोषणाला बसावं लागेल, असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला.

मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला जी मदत लागेल ती द्यायला आम्ही तयार आहोत. पण तोपर्यंत सरकारने एक अध्यादेश काढून मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. मराठा तरुणांना दिलासा दिला पाहिजे. सरकार जर अध्यादेशाचा निर्णय घेणार नसेल तर आम्हालाही मराठा तरुणांसोबत उपोषणाला बसावं लागेल, असा इशारा दरेकर यांनी दिला.

हे गेंड्याच्या कातडीचं सरकार असून केवळ मराठा समजाला खेळवा-खेळवीचं राजकारण हे सरकार करत असल्याचा आरोप दरेकर यांनी केला. ठाकरे सरकारच्या मनात पाप आहे. सर्व भरत्या सुरू केल्या आहेत. सोंग आणि ढोंग करण्याचं काम या सरकारने सुरू केलं आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment