हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणासाठी भाजपकडून राज्यात राबवण्यात येत असलेल्या निधी संकलन मोहीमेवरून शिवसेना राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि भाजप नेते राम कदम यांच्यात खडाजंगी होताना दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दानशूर असून भाजपवाले भिकारी आहेत असं सत्तार म्हणाले होते. यावर आता राम कदम यांनी प्रत्युत्तर देत पुन्हा एकदा शिवसेनेच्या हिंदुत्त्वावर बोट ठेवले आहे.
राममंदिराच्या निर्माणमध्ये प्रत्येक हिंदू बांधवांची आणि रामभक्तची मनापासून इच्छा आहे की निर्माणमध्ये मंदिराची एक विट का होईना आपली असावी असे असताना देखील,, मंदिर निर्माणमध्ये भाग घेणाऱ्या हिंदू बांधव रामभक्तांना भिकारी संबोधने ? हे शिवसेनेचे कोणते हिंदुत्व ? असा सवाल राम कदम यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दानशूर असून भाजपवाले भिकारी आहेत असं सत्तार म्हणाले होते.
#राममंदिराच्या निर्माणमध्ये प्रत्येक हिंदू बांधवांची आणि रामभक्तची मनापासून इच्छा आहे की निर्माणमध्ये मंदिराची एक विट का होईना आपली असावी असे असताना देखील,, मंदिर निर्माण मध्ये भाग घेणाऱ्या हिंदू बांधव रामभक्तांना भिकारी संबोधने ? हे शिवसेनेचे कोणते हिंदुत्व ?
— Ram Kadam (@ramkadam) January 24, 2021
हा सर्व राम भक्तांचा अपमान असून शिवसेनेने सर्व राम भक्तांची माफी मागावी अशी मागणी देखील राम कदम यांनी केली.
यह राम भक्तो का अपमान है क्या शिवसेना का यही हिन्दुत्व है? सभी राम भक्तों की शिवसेना माफी मांगे
— Ram Kadam (@ramkadam) January 24, 2021
नक्की काय म्हणाले होते अब्दुल सत्तार –
अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणासाठी भाजपकडून राज्यात राबवण्यात येत असलेल्या निधी संकलन मोहीमेवरून शिवसेना आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी विरोधकांना लक्ष्य केले. भाजपचे नेते राम मंदिराच्या निधी संकलनाच्या माध्यमातून राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दानशूर व्यक्ती आहेत. इतरांसारखे भिकारी नाहीत, अशा शब्दांत अब्दुल सत्तार यांनी भाजपवर निशाणा साधला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’