लसीकरणासाठी पैसे नाहीत म्हणणारे आता स्वतं:चं कौतुक करण्यासाठी कोट्यवधींचा खर्च करणार – राम कदम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना महामारी मुळे सरकारी तिजोरीत खळखळाट असून निधीअभावी विकासकामे ठप्प आहेत. परंतु एकीकडे विकासकामांवरील निधीला कात्री लावलेली असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सोशल मीडिया सांभाळणाऱ्यांसाठी तब्बल ६ कोटींचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे. यावरून भाजप नेते राम कदम यांनी अजित पवारांवर आणि ठाकरे सरकार वर टीकास्त्र सोडलं आहे.

राम कदम यांनी ट्विट करत म्हंटल की प्राधान्य कशाला आहे? लसीकरणासाठी पैसे नाहीत असं सांगणारे आता स्वतं:चं कौतुक करण्यासाठी कोट्यवधींचा खर्च करणार,” असं म्हणत राम कदम यांनी अजित पवार आणि राज्य सरकारवर निशाणा साधला.

नक्की काय आहे प्रकरण –

अजित पवारांकडे असलेल्या उपमुख्यमंत्री, अर्थ आणि नियोजन उत्पादन शुल्क या खात्यांबाबतचे निर्णय, आदेश आदींची माहिती सोशल मीडियाद्वारे लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी खासगी कंपनी नियुक्त केली जाणार आहे. या कंपनीला या कामासाठी 6 कोटींचा निधी दिला जाणार आहे. ही कंपनी अजित पवारांचे ट्विटर, फेसबुक, ब्लॉगर, यूट्युब आणि इन्स्टाग्राम आदी सांभाळणार आहे. तसेच व्हॉट्सअॅप, टेलिग्राम आणि संदेश पाठविण्याचे कामही या कंपनीला दिले जाणार आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment