हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यातील वादात भाजप आमदार राम सातपुते यांनी उडी घेतली असून वडेट्टीवार यांच्यावर जहरी टीका केली आहे. विजय वडेट्टीवार यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देऊन हातभट्टीचा धंदा टाकावा, अशी घणाघाती टीका राम सातपुते यांनी केली.
एका बापाची ओलाद असेल तर माझ्याविरोधातील आरोप सिद्ध करून दाखवा, असं आव्हान विजय वडेट्टीवार यांनी पडळकरांना दिलं होतं. त्यानंतर विजय वडेट्टीवार हे महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आहेत. काय भाषा, काय विचार? विजय वडेट्टीवार यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देऊन हातभट्टीचा धंदा टाकावा, अशी घणाघाती टीका आता आमदार राम सातपुते यांनी केली आहे.
काय आहे प्रकरण-
आमदार गोपीचंद पडळकर यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर छत्तीसगड येथे दारूची फॅक्टरी असल्याचा आरोप केला होता. आपल्या स्वकियांसाठी कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देऊन चंद्रपुरातील दारूबंदी उठवली, असं गोपीचंद पडळकरांनी म्हटलं आहे. त्यानंतर वडेट्टीवार यांनी पडळकरांना चोख प्रत्युत्तर देत त्यांच्या वर अब्रुनुकसानीचा दावा ठोठावण्याचा निर्णय घेतला.