घारेवाडीत भाजपाची सत्ता : गुप्त मतदानात काॅंग्रेसचा सदस्य फुटला

Gharewadi Gram Panchayat
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी| सकेलन मुलाणी
घारेवाडी (ता. कराड) येथे सरपंच पदासाठी अडीच वर्षानंतर घेण्यात आलेल्या फेर निवडणुकीत सत्ताधारी काॅंग्रेसच्या काका- बाबा गटाला भाजपाने धक्का दिला. बहुमत असतानाही काॅंग्रेसमधील अंतर्गत मतभेदामुळे सत्ता राखण्यात अपयश आले आहे. सदस्याच्या मतदानात सत्ताधारी गटाचा सदस्य फोडत भाजपाच्या सुवर्णा जाधव सरपंचपदी विजयी झाल्या. निवडीनंतर भाजप गटाच्या समर्थकांनी फटाक्याची अतिषबाजी करत गुलालाच्या उधळणीत जल्लोष केला.

निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून डी. सी. दिक्षित व मंडलाधिकारी श्री. रमेश ढाणे यांनी काम पाहिले. तलाठी रामदास जाधव ग्रामसेविका जयश्री केंगले यांनी त्यांना सहकार्य केले. भाजपकडून प्रकाश ताटे, हिंदुराव घारे, उमेश घारे, अमित माने अणि सुरेश घारे, प्रमोद ताटे यासह कार्यकर्त्यानी सत्ता स्थापनेसाठी परिश्रम घेतले. घारेवाडी ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुक 2021 मध्ये झाली होती. ग्रामपंचायतीच्या ९ जागासाठी झालेल्या तिरंगी लढतीत पृथ्वीराज बाबा गटाला 4, उंडाळकर काका गटाला 2 तर भाजपच्या अतुल भोसले गटाला 3 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी सत्तेसाठी बाबा- काका गट एकत्र आले होते. काका गटाच्या एकाच सदस्याला बरोबर सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी सुवर्णा घारे सरपंच झाल्या. त्यानंतर आता ठरल्याप्रमाणे दुसऱ्यास संधी देण्यासाठी सुवर्णा घारे यांनी राजीनामा दिला होता.

त्यामुळे सरपंच निवड निवडणुक प्रक्रिया पुन्हा पार पडली. सरपंच पदासाठी सुवर्णा घारे, अरूणा घारे अणि भाजपाकडून सुवर्णा जाधव तीन अर्ज दाखल झाले होते. यापैकी सुवर्णा घारे यांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतला. अरूणा घारे व सुवर्णा जाधव या दोन उमेदवारासाठी गुप्त पध्दतीने मतदान झाले. नाट्यमय घडामोडीत भाजप गटाने खेळी केली. सत्ताधारी बाबा-काका गटाचा एक सदस्य आपल्याकडे घेत धक्का दिला. सरपंचपद भाजप गटाकडे खेचून आणण्यात यश आले अन् सुवर्णा जाधव विजयी झाल्या. घारेवाडी ग्रामपंचायतीत भाजपची सत्ता स्थापन केली. सरपंच निवडीनंतर भाजप गटाच्या कार्यकर्त्यानी फटाक्याची अतिषबाजी करून गुलालाची उधळण केली.