मार्च-एप्रिल मध्ये भाजप- सेनेचे सरकार येणार; आठवलेंचा राणेंच्या सुरात सूर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मार्च महिन्यात भाजपचे सरकार येणार असा असा खळबळजनक दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केल्यानंतर आता आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी देखील राणेंच्या सुरात सूर मिसळत राज्यात अडीच वर्षे झाल्यानंतर राज्यात शिवसेना- भाजपचे सरकार येईल असा दावा केला आहे. रामदास आठवले हे सांगली दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी हा दावा केला आहे.

रामदास आठवले म्हणाले, मंत्री नारायण राणे यांचे वक्तव्य बरोबर आहे. महाविकास आघाडीचे सरकार राज्यात जास्त काळ टिकणार नाही. अडीच वर्षात राज्यातलं सरकार जाईल. त्यानंतर भाजप आणि शिवसेना एकत्र येऊन नवे सरकार स्थापन होईल.

अडीच वर्षाचा जो फॉर्म्युला होता त्यावर पुन्हा एकदा भाजप-शिवसेनेचे एकमत व्हायला काही हरकत नाही. अडीच वर्षानंतर मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांना द्यावे आणि उपमुख्यमंत्रीपद शिवसेनेला द्यावं असेही रामदास आठवले यांनी म्हटले. अजूनही भाजप आणि शिवसेना यांचे सरकार स्थापन होऊ शकतं असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment