मुंबई प्रतिनिधी | शिवसेना भाजप युती झाली असली तरी भाजप आणि शिवसेना यांच्यातील जागा वाटप अद्याप झाले नाही. मात्र चंद्रकांत पाटील यांनी यावर आपले मत व्यक्त केले आहे. शिवसेना भाजप १३५-१३५ जागांवर लढणार आहेत हे जरी सत्य असले तरी अन्य मित्र पक्षांना आम्हाला जागा वाटपात स्थान द्यावे लागणार आहे. त्यामुळे सेना भाजपचे जागा वाटप हळूहळू खुलत जाणार आहे असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
प्रदेशाध्यक्ष पदासाठी मी परिपूर्ण नाही मात्र उपलब्ध व्यक्तींपैकी मी एक आहे त्यामुळे हे पद माझ्याकडे देण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्षांनी मुख्यमंत्री व्हावेच असे काही नाही. मी कार्यकर्त्यामधून नेता झालो आहे. त्यामुळे मी कोर पाकीट आहे. पक्ष जो पत्ता टाकेल त्या पत्त्यावर मी जाईल असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष यांची संयुक्तिक भूमिका असणारी हि विधानसभेची निवडणूक असणार आहे. त्यामुळे आम्ही निवडणुकीच्या कामाला लागणार आहे असे चंद्रकांत पाटील यांनी म्हणले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चंद्रकांत पाटील यांनी आज प्रदेशाध्यक्ष पदाचा कारभार हाती घेतला. चंद्रकांत पाटील यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात चांगलेच रान तापवले होते. त्यामुळे त्यांना बारामती विधानसभा मतदारसंघाबद्दल देखील प्रश्न विचारण्यात आला. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी बारामती विधानसभा जिंकणे अशक्य आहे. त्यामुळे २०१४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीकडे आम्ही अत्यंत सकारात्मक पध्द्तीने बघत असून हि निवडणूक आम्ही बारामती मतदारसंघ जिंकू असे चंद्रकांत पाटील म्हणाले. त्याचप्रमाणे ईव्हीएमध्ये घोटाळा असता तर आम्ही बारामती लोकसभा निवडणूक जिंकली असती. ज्यांना ईव्हीएम मशीनवर विश्वास नाही त्यांनी निवडणूक आयोगाकडे जाऊन तक्रार करावी असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.