हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाने अक्षरशः उद्रेक केला असून दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णसंख्येत भर पडत आहे. परंतु याच कोरोना काळात काही खाजगी डॉक्टर उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट करीत आहेत. यांमुळे आंध्रप्रदेश प्रमाणे महाराष्ट्रातही खाजगी रुग्णालयात सरकारी रुग्णालयाप्रमाणे रुग्णांवर मोफत उपचार व्हावेत, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या आमदार श्वेता महाले यांनी केली आहे.
खाजगी रुग्णालयांना रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा पुरवठा जिल्हाधिकारी किंवा तहसीलदारांमार्फतच झाला पाहिजे. जेणेकरून गोरगरीब जनतेची पिळवणूक होणार नाही आणि जो गरजू असेल त्याला वेळेत रेमडेसिवीर मिळेल. असेही त्या म्हणाल्या.
आंध्रप्रदेश प्रमाणे महाराष्ट्रातही खाजगी रुग्णालयात सरकारी रुग्णालयाप्रमाणे रुग्णांवर मोफत उपचार व्हावेत जेणेकरून आज आपण पाहतोय की काही ठिकाणी रेमडेसीवीर नाही , कुठे ऑक्सिजन नाही ,बेड नाहीत या गोष्टी आपल्याला टाळता येतील असेही त्या म्हणाल्या.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.