हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपच्यावतीने केंद्रीय तपास यंत्रणांच्या साहाय्याने महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर कारवाई केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. यावरून भाजपचे प्रवक्ते राम कदम यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. “भाजपवर होत असलेले आरोप व आरोपामुळे मलीन झालेली प्रतिमा पुसण्यासाठी आता महाविकास आघाडीविरोधात नवीन मोहीम सुरु करणार आहे. त्यातून आघाडी सरकारची पोलखोल करणार आहे. तसेच आघाडी सरकारच कशा पद्धतीने केंद्रीय तपास एजन्सीविरोधात राजकारण करत आहे याची माहिती जनतेला देणार असल्याचे कदम यांनी म्हंटले.
भाजपचे नेते तथा प्रवक्ते राम कदम यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकावर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारचे मंत्री गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात बोल्ट आहेत. या नेत्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समावेश आहे. भाजपवर आरोप करणाऱ्यांना आता भाजपदेखील पलटवार करणार आहे. आता थेट बूथ बैठकांच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधला जाणार आहे.
राज्यात सत्तेवर असलेले महाविकास आघाडी सरकार हे एक वसुली सरकार आहे. त्यांचे अधिकारी वसुली करतात. त्यांच्यावर सरकारचे नियंत्रण नाही. कारण सरकारच्या आशीर्वादानेच ही सर्व कामे चालतात. वसूली सरकारच्या याच धोरणाची पोलखोल करण्यासाठी आम्ही जनतेपर्यंत जाणार आहोत. आतापर्यंत महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी तसेच मंत्र्यांनी भाजपवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरून आरोप केले आहेत. आता आघाडीतील हेच लोक केंद्रीय तपास यंत्रणेला कशा प्रकारे बदनाम करत आहे?, याची पोलखोल या केली जाणार असल्याची माहिती कदम यांनी दिली आहे.