टीम हॅलो महाराष्ट्र । ”भाजपमध्ये काही मागावं लागत नाही. पक्षासाठी काम करणाऱ्यांना आपोआप मिळतं. ही भाजपची संस्कृती आहे. मात्र, निवडणुकीपूर्वी झालेल्या मेगाभरतीमुळं ही संस्कृती कुठंतरी ढासळली. मेगाभरती ही चूकच होती,” असं जाहीर विधान काल चंद्रकांत पाटील यांनी केलं होत.
दरम्यान आज या विधानावरुन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यु-टर्न घेतला आहे. त्यांनी या संपूर्ण वादावर स्पष्टीकरण दिले आहे. मी जे बोललो त्याचा विपर्यास केला गेला असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आम्ही सर्वांना एकत्र घेऊन काम करतो. मेगा भरतीचा निर्णय हा कोणा एकट्याचा नव्हता, तो कोअर कमिटीचा निर्णय होता असे पाटील यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीच्यावेळी तिकीट वाटपामध्ये जुन्या लोकांना डावललं नाही असा त्यांनी दावा केला. बाहेरुन आलेल्या फक्त २७ जणांना तिकिट दिली असे त्यांनी सांगितले.