हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईतील आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांकडून आंदोलन केले जात आहे. या आंदोलनाच्या मुद्द्यावरून आज भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला आहे. “चौदा दिवस झाले एसटी कर्मचारी आंदोलन करीत आहे. लाज वाटली पाहिजे या सरकारला. जे जुगार खेळले. त्यांनी आपल्या वचनाम्यात लिहले कि एसटीचे विलीनीकरण करू हे. काढा वचननामा यांचे. त्याच्यामध्ये बघावे. आता सांगत आहेत आम्हाला हे करता येत नाही. हे सरकार गोरगरिबांचे नसून लोकधर्जिन सरकार आहार, अशी टीका वाघ यांनी केली.
भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, “राज्यातील एसटी कर्मचारी व जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहिला जातोय. हे सरकार गोरगरिबांचे नसून आमदार, बगलबच्यांचे सरकार आहे. या सरकारने दोन वर्षात अनेकांना फसवले आहे. या राज्यातील सरकार हे मिस्टर नटवरलालचे आहे. अनेक नेत्यांनी खोटी आश्वासने देऊन जनतेला फसविण्याचे काम केले आहे.”
प्रदेश उपाध्यक्षा चित्राताई वाघ यांची पत्रकार परिषद https://t.co/HKP1ACNvab
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) November 24, 2021
दरम्यान, आज भाजपच्या नेत्यांच्यावतीने राज्य सरकावर एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने आरोप करण्यात आले आहेत. दरम्यान आज भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी तसेच ठाकरे सरकावर घणाघाती टीका केली आहे.