गुलामाचा स्वाभीमान जागण्यासाठी 5 वर्षे जावी लागली?? मुनगंटीवारांचा संजय राऊतांना सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मागील पाच वर्षे आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत सत्तेत होतो पण आम्हाला गुलामासारखी वागणूक मिळाली असा धक्कादायक दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी त्यावर चोख प्रत्युत्तर दिले आहे. गुलामाचा स्वाभीमान जागण्यासाठी 5 वर्षे जावी लागली का?? असा थेट सवाल मुनगंटीवार यांनी केला आहे.

मुनगंटीवार म्हणाले, खरं तर आपण केलेल्या बेईमानीला झाकण्यासाठी या शब्दाचा वापर केला जातोय. लोकशाहीत कुणी राजा नाही कुणी गुलाम नाही. गुलामाचा स्वाभीमान जागण्यासाठी 5 वर्षे जावी लागली का असा सवालही त्यांनी केला. जर तुम्हाला गुलामगिरीची वागणूक दिली गेली होती, तर एका सेकंदात राजीनामे तोंडावर फेकून मारायचे ना अस म्हणत 5 वर्ष राजीनामे खिशात का ठेवले असा सवाल मुनगंटीवार यांनी केला.

गुलामगिरीतुन मुक्त होण्यासाठी 24 ऑक्टोबर 2019 च्या निकालाची वाट पाहावी लागली आणि 24 ऑक्टोबर 2019 ला जेव्हा लक्षात आलं की भाजप 105 जागांच्या वर जात नाही तेव्हा यांना आठवण झाली की, 5 वर्षे आम्ही गुलामगिरीत होतो. आता आमच्या पिंजऱ्याचा दरवाजा उघडला आहे आणि आता आम्ही राष्ट्रवादीच्या पिंजऱ्यात जाऊन बसणार, ही त्याची व्याख्या आहे का? असेही मुनगंटीवार यांनी म्हंटल.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment