2024 ला पंतप्रधान पदासाठी तुमचा चेहरा कोण? खर्गेंच्या उत्तराने विरोधकांना आयतं कोलीत

Mallikarjun kharge
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस अध्यक्षपदाच्या शैर्यतीत असलेले जेष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या एका विधानाने विरोधकांना मात्र टीका करण्यासाठी आयते कोलीत मिळालं आहे. २०२४ साली पंतप्रधान पदासाठी तुमचा चेहरा कोण असा सवाल त्यांना केला असता आपल्याकडे एक म्हण आहे बकरीद मे बचेंगे तो मोहर्रम मे नाचेंगे असं उत्तर त्यांनी दिल्याने भाजपने त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

नेमकं काय झालं ?

काँग्रेस अध्यक्षपदासाठी मुख्य दावेदार असलेले मल्लिकार्जुन खर्गे यांनी भोपाळ येथे जाऊन पक्षाचे वरिष्ठ नेते आणि निवडून आलेल्या प्रदेश काँग्रेस प्रतिनिधींशी चर्चा केली. तसेच अध्यपदासाठी पाठिंबाही मागितला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांना २०२४ साली पंतप्रधान पदासाठी तुमचा चेहरा कोण असा सवाल करण्यात आला. यावर उत्तर देताना खर्गे म्हणाले, मी सध्या तरी निवडणूक प्रचारासाठी आलोय. आपल्याकडे एक म्हण आहे. बकरीद मे बचेंगे तो मोहर्रम मे नाचेंगे… आधी निवडणूक तरी होऊ द्या…

भाजप नेत्यांचा आक्षेप –

खरगे यांच्या या विधानानंतर भाजपने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी मल्लिकार्जुन खरगे यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे. मोहरम हे सेलिब्रेशन नसून शोक आहे. हा मुस्लिमांचा मोठा अपमान आहे असं त्यांनी म्हंटल. भाजपच्या आयसेलचे प्रमुख अमित मालवीय यांनीही खर्गे यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे. म्हणाले, हे वक्तव्य खूपच असंवेदनशील आहे. २०२४ पर्यंत काँग्रेसला अस्तित्व टिकवणंच कठीण झालं आहे अशी टीका त्यांनी केली.