केवळ सत्तेच्या स्वार्थासाठीच महाविकास आघाडी एकत्र ; उदयनराजे कडाडले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केवळ सत्तेच्या स्वार्थासाठी महाविकास आघाडीतील तीन पक्ष एकत्र आले आहेत. स्वार्थ संपला की ते एकत्र राहणार नाहीत, अशी टीका भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. केवळ सत्ता हस्तगत करणं हा त्यांचा एकत्र येण्यामागचा हेतू आहे, असा आरोप देखील उदयनराजे भोसले यांनी केला आहे.

ज्यावेळेस वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्र येतात, त्यावेळेस त्यांना एकत्र ठेवण्याकरिता अमिष दाखवले जाते. मात्र ते कधीच एकत्र राहत नाहीत. त्यांचा उद्देश सार्थक झाला तर ते सर्व निघून जातात. याला फक्त भाजप अपवाद आहे. भाजप विचाराने एकत्र आहे. त्यांना कोणत्याही ताकदीचा वापर करावा लागत नाही. त्यांचे उद्दिष्टं निश्चित असून त्यामुळेच ते एकसंघ आहेत, असं उदयनराजे यांनी सांगितलं.

भाजप राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व सहा जागा मोठ्या मताधिक्याने जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपमध्ये एकोपा आहे. टीमवर्क आहे. त्याचं फळ निश्चितच दिसून येईल, असंही ते म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’