हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाड येथील तळीये गावात पावसामुळे दरड कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती. तब्बल 40 पेक्षा अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल तळीये गावात जाऊन दरडग्रस्तांची भेट घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यानंतर आज भाजपचे केंद्रीयमंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, देवेंद्र फडणवीस हे तळिये गावात दाखल झाले. तसेच त्यांनी या गावाची पाहणी केली. यावेळी मंत्री राणे म्हणाले कि, ” येथील लोकांचे पुनर्वसन करून पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून घरे बांधून दिली जाणार आहे. या ठिकाणी मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांना पूर्णपणे मदतकार्य केले जाईल.
यावेळी मंत्री राणे म्हणाले की, या ठिकाणी आपत्ती घडल्यामुळे लोकांचे नुकसान झाले आहे. अतिशय प्रामाणिकपणे इथे टीमने काम केले. या ठिकाणी मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांना पूर्णपणे मदतकार्य केले जाईल. पंतप्रधान आवास योजनांच्या माध्यमातून येथील लोकांना चांगली घरे बांधून दिली जाईल. येथील शासकीय यंत्रणेकडूनही काम केले गेले आहे.
यावेळी नारायण राणे म्हणाले कि, या ठिकाणी डोंगर कोसळेल याची कल्पना कुणाला आली होती का? पहिल्यांदा येथील लोकांचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे. मी येण्या अगोदरपासून केंद्राकडून या ठिकाणी मदत आलेली आहे. येथील परिस्थिती पाहिल्यानंतर, नुकसानीचे स्वरूप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देणार आहे. केंद्र सरकारकडून आपत्ती व्यवस्थापनासाठी मोठी टीम आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. दरम्यान महाडनजिक तळिये या गावात स्थिती अतिशय भीषण आहे. काही मृतदेह स्वतः गावकऱ्यांनी बाहेर काढले आहेत. एनडीआरएफची टीम तेथे पोहोचली आहे. काही अनेक लोक अडकून असल्याने त्यांना टीमच्यावतीने बाहेर काढण्यात आले.