‘भाजपने व्हर्च्युअल रॅलीसाठी १५० कोटी खर्च केले, हेच पैसे मजुरांसाठी वापरता आले नसते का?’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रांची । केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे इतर बडे नेते सध्या पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकीचा प्रचार करत आहे. या व्हर्च्युअल रॅलीच्या आयोजनासाठी तब्बल १५० कोटींचा खर्च आला असेल. हेच पैसे देशभरातील मजुरांना त्यांच्या गावी मोफत पोहोचवण्यासाठी वापरता आले नसते का, असा सवाल झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी उपस्थित केला. ते मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

हेमंत सोरेन यांनी म्हटले की, केंद्र सरकारकडून आमच्या अपेक्षा तर खूप साऱ्या आहेत. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे झारखंडला केंद्राकडून अजून एकही व्हेंटिलेटर मिळालेला नाही. आम्ही अत्यंत तुटपुंज्या साधनसामुग्रीसह काम करत आहोत. मात्र, कोरोनाच्या संकटातही व्हर्च्युअल रॅलीजचे आयोजन करणारा भाजप आपल्याच धुंदीत वावरत आहे, अशी टीका हेमंत सोरेन यांनी केली. दरम्यान, अमित शाह यांनी व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा श्रीगणेशा केला होता. काल मंगळवारी त्यांनी पश्चिम बंगालच्या मतदारांशीही संवाद साधला होता. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment