कराड नगरपालिकेची निवडणूक भाजप कमळ चिन्हावरच लढविणार : एकनाथ बागडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

भारतीय जनता पक्षाने सर्वच निवडणुका या पक्षाच्या निवडणुकावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कराड नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीतही सर्व जागा पक्षाच्या चिन्हावरच लढविल्या जातील, असे कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांनी जाहीर केले.

कराड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांची आढावा बैठक झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांनी आगामी कराड नगरपालिकेच्या निवडणुकीविषयी पक्षाची भूमिका जाहीर केली. यावेळी नेते शेखर चरेगावकर, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, जेष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, नगराध्यक्षा रोहीणी शिंदे, धनाजी पाटील, शहर सरचिटणीस प्रमोद शिंदे, नगरसेवक सुहास जगताप यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजपचे नेते शेखर चरेगावकर म्हणाले, आमचा भाजपा पक्ष स्वबळावर लढणार असून त्याला कराड पालिका अपवाद नाही. भाजपाचे मित्रपक्ष यांना सोबत घेतले जाईल. मागच्यावेळी काही आघाड्यासोबत निवडणुका लढविल्या गेल्या होत्या, आता आमच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढविणाराचा विचार केला जाईल. मात्र स्थानिक कोणत्याही आघाडीसोबत निवडणूक लढविली जाणार नाही.

Leave a Comment