सोलापूर । राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी भाजप आणि मनसे युती होण्याची चर्चा सुरु आहे. अशावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत (Chandrakant Patil) पाटील मनसेसोबतच्या युतीबाबत मोठं विधान केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) जोपर्यंत परप्रांतीयांबाबतची भूमिका बदलत नाहीत तोपर्यंत भाजप त्यांच्याशी युती करणार नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. ते शुक्रवारी सोलापुरात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी चंद्रकांत पाटील यांना भाजप आणि मनसे यांच्यातील वाढत असलेल्या जवळीकीबद्दल प्रश्न विचारण्यात आले. महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप मनसेसोबत युती केवळ एका अटीवर करणार असल्याचे संकेत पाटील यांनी दिले. ती अट म्हणजे मनसची परप्रांतीयांबाबतची भूमिका. मनसेने ही भूमिका सोडल्यास युती करण्यास तयार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. यानंतर आता राज ठाकरे भाजपशी युती करण्यासाठी ही अट मान्य करणार का, हे आता पाहावे लागेल.
दरम्यान, राज ठाकरे हे अयोध्या (Ayodhya) दौरा करणार आहेत. येत्या 1 मार्च ते 9 मार्चदरम्यान राज ठाकरे अयोध्येला जाणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. राज ठाकरे यांच्या या दौऱ्यातून मनसे भाजपच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकरूप होण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळं मनसे आणि भाजप युती होणार असल्याची अटकळ आता राजकीय वर्तुळात लावली जात आहे. राज यांच्या अयोध्या दौऱ्या बाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना विचारलं असता, ते म्हणाले, मी सुद्धा अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचे सांगितले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.