डिसेंबरमध्ये भाजपकडून सरकार विरोधात उग्र आंदोलन; चंद्रकांत पाटलांची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचं गुन्हेगारीकरण झालं असून त्याविरोधात भाजपकडून संपूर्ण राज्यभर जवळपास 20 हजार सभा घेऊन जनजागृती करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्य सरकारविरोधात डिसेंबरमध्ये राज्यभर उग्र निदर्शने करण्यात येणार आहेत, अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे.

भ्रष्टाचार, अंमलीपदार्थांचे समर्थन, राज्यातील महिलांवरील अत्याचार, व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न आणि राजकारणाचे गुन्हेगारीकरण याबाबत जनतेत जागृती निर्माण करण्यासाठी भाजप राज्यभर 20 हजार छोट्या सभांचे आयोजन करण्यात येईल. त्यानंतर डिसेंबरमध्ये मोठं आंदोलन करू, अस चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

यावेळी त्यांनी अमरावती हिंसाचारावर देखील भाष्य केले. महाराष्ट्रामध्ये २०१४ ते २०१९ पासून देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये एकही दंगा झालेला नाहीये. त्यामुळे मुस्लिमांवर अन्याय किंवा अत्याचार होतोय का?. असं नाहीये. ९५ टक्के मुस्लिम समाज हा या सर्व गोष्टींच्या विरोधात आहे. पाच टक्के मुस्लिम दंगे करून 95 टक्के मुस्लिमांवर अशा गोष्टींचं लेबल लावत आहेl. हे चुकीचं आहे

Leave a Comment