अमित शहांच्या सभेत राडा, भाजप कार्यकर्त्यांच्या गाड्यांची तोडफोड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मिदनापूर प्रतिनिधी | भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या मिदनापूर येथील सभेला आलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याचे समजत आहे. यामुळे ईशान्य मिदनापूर आणि आसपास च्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. वाहनांच्या तोडफोडीमागे ममता बनर्जींच्या TMC पक्षाचा हात असल्याचा आरोप केला जात आहे.

अमित शहा सध्या पश्चिम बंगाल च्या दौर्यावर असून मिदनापूर येथे त्यांची सभा पार पडली. शहा यांच्या मिदनापूर येथील सभेला राज्याच्या कानाकोपर्यांतून भाजप कार्यकर्ते दाखल झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी सभेच्या स्थळापासून जवळ आपल्या वाहनांचे पार्किंग केले होते. मात्र अज्ञातांनी भाजप चे झेडे असलेल्या वाहनांची तोडफोड केली आहे. तसेच काही वाहनांची जाळपोळ केली असल्याचेही समजत आहे.

“TMC ला भाजपचे शक्तीप्रदर्शन पाहून भीती वाटत आहे. आणि त्याचमुळे त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांची तोडफोड केली आहे. हा सर्व प्रकार पोलिसांच्या डोळ्यांदेखत झाला याचा खेद आहे” असे म्हणून भाजप नेते राहुल सिंह यांनी ममता बनर्जी याच्यावर आरोप केले.

https://youtu.be/pPjp_NCPz54

Leave a Comment