सांगली प्रतिनिधी । प्रथमेश परब
मनी लॉडरींग प्रकरणात ईडीने अटक केलेल्या अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा म्हणून सांगली शहर जिल्हा भारतीय जनता पार्टीने मारुती चौकात तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व आमदार सुधीरदादा गाडगीळ व भाजप प्रदेश सचिव पृथ्वीराज भैया पवार यांनी केले. यावेळी 1993 साली मुंबई बॉम्बस्फोटां मध्ये मृत्यू पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहिली तसेचभ्रष्टाचारी देशद्रोही मंत्री नबाब मलिक यांच्या प्रतिमेस चप्पल हार घालून निषेध व्यक्त केला.
यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ म्हणाले,”मुंबईत बॉम्बस्फोट घडविणाऱ्या देशद्रोही दाऊद इब्राहिमच्या कुटुंबियांकडून वादग्रस्त जमीन घेऊन मलिक यांनी एक प्रकारे देशद्रोह्यांना मदतच केली आहे. मलिकाना पाठीशी घालणाऱ्या महाविकासआघाडी नेत्यांचा हा उद्योग चुकीचा आहे. देशद्रोही ना मदत करणाऱ्या मलिक यांना मंत्री पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरलेला नाही. त्यामुळे त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा,” अशी मागणी आंदोलन वेळी केली.
नबाब मलिक यांनी 300 कोटींची जमीन अवघ्या 55 लाख आत घेऊन उरलेले रुपये देशद्रोही कारवायांसाठी दाऊदला पोचवले आहेत. हे प्रकरण अतिशय गंभीर असल्यामुळे मंत्री नवाब मलिक यांची देशद्रोही गुन्ह्याखाली चौकशी करावी व राजीनामा नाही दिल्यास याही पेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला.