व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

6 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात; ‘या’ प्रकल्पाचे करणार उद्घाटन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना अटक करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात एकमेकांवर टीकास्र्त डागले जात आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात येणार असून 6 मार्च रोजी त्यांच्या हस्ते पुणे येथे मेट्रोच्या प्रकल्पाचे उदघाटन होणार आहे.

महाराष्ट्रातील महत्वाचे शहर असलेल्या पुणे शहरातील गरवारे या मेट्रोच्या स्टेशनचं उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तसेच पुणे महानगरपालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान मोदी करणार आहेत.

पुणे महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. महापालिका निवडणूकीच्या तोंडावर पंतप्रधान मोदींचा दौरा भाजपसाठी महत्त्वाचा मानला जात आहे.