भाजपकडून राजकीय फायद्यासाठी राज्य सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न ; वडेट्टीवारांचा आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला असताना आता ओबीसींच्या आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपकडून राजकारण केल जात आहे. भाजपकडून केल्या जात असलेल्या राजकारणाचा आज राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी समाचार घेतला. वडेट्टीवार यांनी आज पुणे येथे महत्वाची बैठक घेतली. त्या बैठकीनंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. राज्यातील भाजपकडून मराठा समाज व ओबीसी समाजाच्या प्रश्नावरीन राजकारण केले जात आहे. तसेच राज्यसरकारला बदनामही केले जात असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.

पुणे येथे ओबीसी समाजाबाबत महत्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीनंतर मंत्री वडेट्टीवार यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी वडेट्टीवार म्हणाले, “मराठा आरक्षण प्रश्नी जो काही सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर मराठा समाज व ओबीसी समाजाची जातनिहायक जनगणना न्याय मिळेल. मात्र, भाजपकडून जाणीवपूर्वक आरक्षणाच्या व जनगणनेच्या मुद्यांवरून राजकारण केले जात आहे.

प्रत्येक समाजाप्रमाणे राज्यातील मराठा समाजबांधवांना देखील आपले आरक्षण मागण्याचा पूर्णपणे अधिकार, हक्क आहे. त्यांना आरक्षणाचा हक्क मिळवण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळणारच आहे. तसेच ओबीसी समाज बांधवांची जनगणनाही होणार असल्याची माहिती मंत्री वडेट्टीवार यांनी पुणे येथे दिली.