कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोयना वसाहत ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत डॉ. अतुल भोसले यांच्या स्व. राजेंद्र पाटील कोयना वसाहत विकास आघाडी पॅनलने 10-1 असा विजय मिळवत विरोधकांचा धुव्वा उडवला. या ठिकाणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, युवा नेते उदयसिंह पाटील- उंडाळकर आणि शिवसेना यांच्या नेतृत्वाखालील जनशक्ती विकास आघाडीला एकही जागा मिळाली नाही. तर एका अपक्षानेही बाजी मारली आहे.
कोयना वसाहत ग्रामपंचायतीत विजयी व पराभूत उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे – सर्वसाधारण गट – प्रभाग 1- विजयी- उमेश कुलकर्णी- 202, पराभूत – आरती शिंदे (32), रविंद्र हिनुकले (32), सर्वसाधारण गटातून स्त्री राखीव – प्रभाग 1- विजयी- संगीता पाटील (220), पराभूत- नीलिमा बाबर (45). सर्वसाधारण गट – प्रभाग 2- विजयी- सम्राट पाटील (263), पराभूत- काकासो उर्फ संजय चव्हाण (132), सर्वसाधारण गटातून स्त्री राखीव – प्रभाग 2- विजयी- रजनी गुरव (276), सुनिता भोसले (270), पराभूत- मंजु पाटील (138), अर्चना यादव (106). सर्वसाधारण गट – प्रभाग 3- विजयी- विनायक कुलकर्णी (327), चंद्रशेखर पाटील (315). पराभूत- नरेंद्रकुमार धर्मे (204), विक्रम पवार (192), तुकाराम चव्हाण (31). सर्वसाधारण गटातून स्त्री राखीव – प्रभाग 3- विजयी- सुवर्णा वळीव (301), पराभूत- लता माने (232). सर्वसाधारण गट – प्रभाग 4- विजयी- निलेश भोपते (274). पराभूत- बिपीन मिश्रा (238), शिवाजी चव्हाण (45), वैभव कवठेकर (25). सर्वसाधारण गटातून स्त्री राखीव – प्रभाग 4- विजयी- कुसुम पुजारी (419), शितल जाधव (32). पराभूत- सुलोचना शेवाळे (197), सोनाली देशमुख (134), प्रमिला चव्हाण (95).
वाॅर्ड क्रमांक 4 पुन्हा अपक्षाला
कोयना वसाहत 11 जागांसाठी तब्बल 27 उमेदवार रिंगणात होते. यामध्ये 5 अपक्षांनीही आपले नशीब अजमावले परंतु त्यामध्ये केवळ निलेश भोपते यांनी सर्वसाधारण गटातून प्रभाग 4 मधून 588 मतदानापैकी तब्बल 274 मते मिळवत विजय मिळविला. तर वैभव अरूण कवठेकर यांनी दोनवेळा अपक्ष निवडणूक लढवित सदस्यपद मिळवले. तसेच दीड वर्ष उपसरपंच पदीही काम केले होते. परंतु प्रभाग 4 मधून वैभव कवठेकर यांना केवळ 25 मते मिळाली. वाॅर्ड क्रमांक 4 ने पुन्हा एकदा अपक्षालाच साथ दिली आहे. कोयना वसाहत ही मलकापूर व कराड शहराजवळील मोठी ग्रामपंचायत आहे. येथे भाजपच्या डाॅ. अतुल भोसले यांच्या गटाच्या विरोधात सर्व विरोधकांनी एकजूट केली होती. परंतु तरीही विरोधकांना खाते उघडता आले नाही.