काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन; प्रियांका गांधींना पोलिसांनी अक्षरशः फरफटत नेले, राहुल गांधीही ताब्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील वाढती महागाई, बेरोजगारीआणि ईडीच्या कारवायांविरोधात काँग्रेसने देशभर आंदोलन छेडले आहे. आज दिल्लीत झालेल्या या आंदोलना दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी याना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी प्रियांका गांधी याना पोलिसांनी अक्षरशः फरफटत नेण्यात आल्याचं समोर आलं आहे.

लोकसभा आणि राज्यसभा खासदारांनी संसद भवन ते राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढला होता. मात्र पोलिसांनी त्यांना विजय चौकातच रोखले आणि त्यांच्यासह अनेक नेत्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर प्रियंका गांधी यांना अक्षरश:फरफटत पोलिसांनी ताब्यात घेतलं. याबाबतचा एक विडिओ समोर आला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातही काँग्रेसकडून केंद्र सरकारकडून जोरदार आंदोलनं सुरु आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राजभवनाच्या दिशेने मार्च काढत असताना पोलिसांनी नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि भाई जगताप, नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, वर्षा गायकवाड, मोहन जोशी, देवानंद पवार, प्रमोद मोरे यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.