हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल नियुक्त 12 नामनिर्देशित आमदारांची यादी भुताटकीचा वावर असून त्यांनी फाईल पळविली की काय असा खोचक सवाल राज्यपालांना केला होता. त्यावर भाजपचा यात काही संबध नाही, पण जर का भाजपने एक डाव भुताचा टाकला तर तुम्हांला भारी पडेल असा इशारा संजय राऊत यांना आशिष शेलार यांनी लगावला आहे.
भाजपचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, कोरोनाच्या काळात 12 आमदारांचा विषय कुठून आला? कोरोनच्या पार्शवभूमीवर कोणत्याही निवडणुकीचं काम केलं तर त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकारला जबाबदार धरल जात आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्यपाल सचिवालयाकडे 12 आमदारांच्या नावाचा यादी मागितली होती. मात्र, सचिवालयाने अशी यादी उपलब्ध नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे यावरुन राजकारण सुरु आहे.