हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रक्तवाहिन्यांमधला रक्ताचा दाब म्हणजे रक्तदाब. हा रक्तदाब एका ठराविक प्रमाणापेक्षा जास्त किंवा कमी असेल तर आरोग्यासाठी घातक असतं. पण सध्याच्या धावपळीच्या जगात रक्तदाबावर नियंत्रण ठेवणे हे आव्हान बनले आहे. रक्तदाब वाढला तर हृदयालाही धोका असतो हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे रक्तदाब योग्य प्रमाणात राहणं अत्यंत महत्त्वाचं असतं. आज आपण जाणून घेऊया वयानुसार पुरुष आणि महिलांना किती रक्तदाब असावा.
सामान्य रक्तदाब हा 120/80 एवढा असतो परंतु तज्ञांच्या मते तो वयानुसार बदलू शकतो. वयानुसार सामान्य रक्तदाब 90/60 ते 145/90 दरम्यान असू शकतो. पण ही रेंजही आपल्या शारीरीक स्थितीवर अवलंबून असते. रक्तदाब खूप काळासाठी वाढलेला राहिला, तर त्याचा आरोग्यावर खूप मोठा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या आजाराला ‘सायलेंट किलर’ असं म्हटलं जातं.
वयानुसार पुरुषांचा BP किती असावा
0-25 वर्षांच्या पुरुषांचा BP 120.5/78.5mm असावा.
26-30 वर्षांच्या पुरुषांचा BP 119.5/76.5 mm असावा
31-35 वर्षांच्या पुरुषांचा BP 114.5/75.5 mm असावा
36-40 वर्षांच्या पुरुषांचा BP 120.5/75.5 mm असावा
41-45-वर्षांच्या पुरुषांचा BP 115.5/78.5 mm असावा
46-50 वर्षांच्या पुरुषांचा BP 119.5/80.5 mmअसावा
51-55 वर्षांच्या पुरुषांचा BP 125.5/80.5 mm असावा
56-60 वर्षांच्या पुरुषांचा BP 129.5/79.5 mm असावा
61-65 वर्षांच्या पुरुषांचा BP 143.5/76.5 mm असावा
वयानुसार महिलांचा BP किती असावा
21-25 वर्षांच्या महिलांचा BP 115.5 / 70.5 असावा
26-30 वर्षांच्या महिलांचा BP 113.5 / 71.5 असावा
31-35 वर्षांच्या महिलांचा BP 110.5 / 72.5 असावा
36-40 वर्षांच्या महिलांचा BP 112.5 / 74.5 असावा
41-45 वर्षांच्या महिलांचा BP 116.5 / 73.5 असावा
46-50 वर्षांच्या महिलांचा BP 124 / 78.5 असावा
51-55 वर्षांच्या महिलांचा BP 122.55 / 74.5 असावा
56-60 वर्षांच्या महिलांचा BP 132.5 / 78.5 असावा
61-65 वर्षांच्या महिलांचा BP 130.5 / 77.57असावा