नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात RBI ने मणप्पुरम फायनान्सला मोठा झटका बसला आहे. काही नियमांचे पालन न केल्याबद्दल RBI ने मणप्पुरम फायनान्सला कंपनीला 17.6 लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे. प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स (PPI) आणि नो युवर कस्टमर (KYC) शी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आले आहे.
याबाबत RBI ने म्हटले आहे की, “पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम्स कायदा, 2007 च्या कलम 30 अंतर्गत RBI ला दिलेल्या अधिकारांचा वापर करून हा दंड लावण्यात आला आहे. ही कारवाई नियामक अनुपालनातील कमतरतांवर आधारित आहे आणि कंपनीच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर मत व्यक्त करण्याचा हेतू नाही.”
RBI ने जारी केलेल्या आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “KYC आणि PPI बाबत RBI ने जारी केलेल्या सूचनांचे पालन सदर संस्था करत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मणप्पुरम फायनान्सला कारणे दाखवा नोटीस बजावून दंड का आकारू नये, अशी विचारणा करण्यात आली.
मणप्पुरम फायनान्स पुढील आर्थिक वर्षात 7,800 कोटी रुपये उभारणार आहे
नुकतेच, मणप्पुरम फायनान्सने सांगितले की, त्यांच्या संचालक मंडळाने पुढील आर्थिक वर्षात 7,800 कोटी रुपयांचा फायनान्स उभारण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याचे कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीत म्हटले आहे. यानुसार, नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचरद्वारे 7,800 कोटी रुपये उभे केले जातील.