हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूमुळे जगातील अनेक देशांत लॉकडाउन सुरु केले गेले आहे.यामुळे बर्याच देशांमध्ये प्रदूषणाची पातळी देखील कमी झाली आहे,तर दुसरीकडे गर्दी असलेले क्षेत्र ओसाड झाले आहे.अशावेळी एका समुद्राच्या किनाऱ्यावर एक नयनरम्य दृश्य पाहायला मिळालं आहे.त्यावेळी समुद्राच्या लहरींमधून अचानक रंगीबेरंगी प्रकाश दिसू लागला.
हे प्रकरण मेक्सिकोच्या अॅकॅपुल्कोमधील आहे. कोरोनामुळे, समुद्रकिनार्यावर सामान्य लोकांची ये-जा कमी होत आहे.यावेळी समुद्रामध्ये अस्तित्वात असलेल्या जीवांमध्ये एक अनोखी वैज्ञानिक घटना Bioluminescent पाहायला मिळाली.Bioluminescent म्हणजे या समुद्री जीवांच्या शरीरातून प्रकाशाचे प्रकाशन होणे.
ही घटना सोमवार रात्रीची आहे.पण त्याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.याविषयी तज्ञ म्हणतात की अशी घटना पाण्यातील सूक्ष्मजीवांच्या बायोकेमिकल रिअॅक्शनमुळे घडते.समुद्राच्या लाटांवरील रंगीत प्रकाश पाहून लॉकडाऊन असूनही बरेच लोक समुद्र किनाऱ्यावर पोहोचले आणि त्यांनी त्यांच्या कॅमेर्यामध्ये ही छायाचित्रे टिपली. डेली मेलच्या एका वृत्तानुसार गेल्या ६० वर्षात प्रथमच ही घटना पाहिली गेली.
मेक्सिकोमधील अॅकॅपुल्को टुरिझम बोर्ड याविषयी सांगते की Puerto Marqués बीचमधील ही घटना समुद्रातील सूक्ष्मजीवांमध्ये होणाऱ्या बायोकेमिकल रिअॅक्शनचे एक बायप्रोडक्ट आहे.
काही लोकांनी सोशल मीडियावर लिहिले की, अशी घटना समुद्राच्या किनारी असलेल्या लोकांच्या कमी उपस्थितीमुळे घडली.पण मारिन बायोलॉजिस्ट एनरिक आयला दुवाल यांनी लोकांचे हे म्हणणे नाकारले.एन्रिक आयला दुवाल यांनी लिहिले की प्रथिने, ऑक्सिजन,अॅडेनोसाइन ट्रायफॉस्फेट आणि इतर गोष्टींच्या रिअॅक्शनमुळे असा प्रकाश उत्सर्जित होतो.
Bioluminescence appears on the beaches of Puerto Marquez, Acapulco, #Mexico.@dezabedrosky #acapulco #plaza #puertomarquez #beach #videos #climatechange #likes4like #lights #lighthouse #cute #awesome #mundial pic.twitter.com/vvhoLpDACh
— Corelion, LLC (@corelionnews) April 22, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.