BMC Election 2026 : उद्धव 150- राज 70; मुंबईत ठाकरे बंधूंचे जागावाटप ठरलं?

BMC Election 2026 uddhav raj
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन BMC Election 2026 । मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंच्या मनसेचे जागावाटप अंतिम टप्प्यात आल्याचे बोललं जात आहे. राज ठाकरेंपेक्षा उद्धव ठाकरेंची ताकद मुंबईत नक्कीच मोठी आहे. आजही मुंबईत ठाकरेंचे २० आमदार आणि २ खासदार असल्याने उद्धव ठाकरे हे युतीत सुद्धा मोठा भाऊ असणार हे सुरुवातीलाच स्पष्ट झालं होते. आता सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंची शिवसेना १५० जागांच्या आसपास उमेदवार उभे करेल तर राज ठाकरेंच्या मनसेला ६५ ते ७० जागा मिळतील असं बोललं जात आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ठाकरे बंधूंसोबत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यास त्यांनाही दोन्ही बाजूनी काही जागा देण्यात येतील.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 2017 च्या निवडणुकीत जिंकलेल्या 12 ते 15 जागा राज ठाकरे यांच्या मनसेसाठी सोडल्या आहेत. या जागांवरील माजी नगरसेवक हे आता शिंदे गटात गेले आहेत. त्याठिकाणी उद्धव ठाकरेंकडे प्रभावी असा चेहरा नाही, तुलनेत या जागांवर मनसेकडे ताकदवान उमेदवार उपलब्ध आहेत. त्यामुळे या जागा मनसेला सोडण्यात आल्या आहेत. शिवडी, दादर, माहीम, भांडुप, विक्रोळी मतदारसंघातील काही जागांवरून ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये रस्सीखेच सुरू होती . कारण हे सगळे भाग मराठीबहुल आहेत. मात्र तिथेही दोन्ही पक्षाकडून एकमत झालं आहे . (BMC Election 2026 ) शिवडी, दादर आणि माहीममधल्या बहुतांश प्रभागांचा तिढा सोडवण्यात दोन्ही पक्षांना यश आलं आहे. परंतु भांडूप, कांदिवली, बोरिवली, मुलुंड परिसरातील काही वॉर्डांमधील तिढा अजूनही सुटलेला नाही. हा तिढा सुटून संपूर्ण जागावाटप झाल्यानंतरच युतीची अधिकृत घोषणा व्हावी, असा राज ठाकरे यांचा आग्रह असल्याची सूत्रांची माहिती आहे.

संजय राऊत काय म्हणाले? BMC Election 2026

दरम्यान, आज प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, शिवसेना आणि मनसेची युती कार्यकर्त्यांनी युती स्वीकारली आहेत. कोणाच्या मनात संभ्रम नाही. मनोमिलन झालेलं असून जागावाटपवर काल रात्री शेवटचा हात फिरवला गेलाय. आमच्यात जागावाटपावरून कोणताही विसंवाद नाही. जागा वाटपाबद्दल कुठेही ताणतणाव आणि रस्सीखेच नाही. वरळीमधील डोमममध्ये जेव्हा दोन भाऊ एकत्र आले तेव्हाच युती झाली. काही विद्यमान नगरसेवक असतात त्यांच्या जागांची आदलाबदल होत असते युतीमध्ये. त्याकरिता लोकांना एकत्र बसवून मार्ग काढावा लागतो अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.