व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

…तर संपूर्ण इमारत सील करणार ; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीएमसीची नवीन गाईडलाईन जारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून जनतेची चिंता वाढली आहे.दरम्यान राज्याची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्यामुळे महापालिका सतर्क झाली असुन, या पार्श्वभूमीवर आता नवी गाइडलाईन जारी करण्यात आली आहे. यानुसार आता एका इमारतीत पाच पेक्षा अधिक करोनाबाधित आढळले तर ती संपूर्ण इमारतच सील केली जाणार आहे.

काय आहे बीएमसीच्या गाईडलाईन –

कुठल्याही निवासी इमारतीत कोरोनाचे पाच पेक्षा जास्त सक्रीय रुग्ण आढळल्यास ती इमारत सील करण्यात येईल (BMC new guidelines on corona).

विलगीकरणाचे नियम, तसेच लग्न आणि सार्वजनिक कार्यक्रमात नियम न पाळणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल.

घरी विलगीकरणात राहणाऱ्या व्यक्तींच्या हातावर शिक्का लावण्यात येईल.

मास्‍कचा योग्‍यरित्‍या उपयोग न करणाऱया तसेच सार्वजनिक जागी थुंकणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्‍यासाठी मुंबईत सध्‍या कार्यरत असलेल्‍या २,४०० मार्शल्सची संख्‍या दुपटीने वाढवून ती ४,८०० इतकी करावी. विना मास्‍क फिरणाऱ्यांवर जरब बसवणे आवश्‍यक आहे. त्‍यादृष्‍टीने सध्‍या होत असलेली सरासरी १२ हजार ५०० नागरिकांवरील कारवाईची संख्‍या वाढवून दररोज संपूर्ण मुंबईत मिळून किमान २५ हजार नागरिकांवर दंडात्‍मक कारवाई करण्‍यात यावी.

लग्न सोहळ्यांचे आयोजन होणारे सभागृह, मंगल कार्यालये येथे नियमितपणे तपासणी केली जाईल. कोणत्याही नियमांचे उल्लंघन झाले असल्यास दंडात्मक कारवाई करुन आयोजक आणि संबंधित व्यवस्थापनांवर गुन्हे दाखल केले जातील.

केंद्र सरकारच्‍या नियमावलीप्रमाणे, आता ब्राझिलमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांनाही संस्‍थात्‍मक विलगीकरणात रहावे लागणार आहे. यामुळे मुंबई विमानतळावर ब्राझिलमधून येणाऱ्या प्रवाशांना सक्‍तीने सात दिवसांच्‍या संस्‍थात्‍मक विलगीकरणात ठेवण्‍याचा निर्णय बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला असून त्‍याची अंमलबजावणी सुरु करण्‍यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’