मुंबई महापालिकेनं केले तबलिगी जमातच्या १५० जणांवर गुन्हे दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । दिल्लीच्या निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमाहून परतलेल्यांनाइशारा देऊनही स्वत:हून पालिकेसमोर न येणाऱ्या तबलिगी जमातच्या १५० जणांविरोधात मुंबई महापालिकेने आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. तर मुंबईत आढळलेल्या रुग्णांपैकी ९० टक्के रुग्ण हे तबलिगींच्या संपर्कातील असून इतर रुग्ण हे केवळ १० टक्केच असल्याची माहिती महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिली आहे.

दरम्यान, मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा ५००च्यावर गेला आहे. यातील बहुतेक रुग्ण हे दुबई आणि दिल्लीतील निजामुद्दीन येथून आलेल्यांच्या संपर्कातील असल्याचं परदेशी यांनी म्हटलं आहे. मात्र, मुंबईत कम्युनिटी ट्रान्स्फर झालेलं नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

मुंबईत साडे दहा हजार टेस्ट करण्यात आल्या असून टेस्ट वाढवत असल्याने रुग्णही सापडत असल्याचं ते म्हणाले. वरळी आणि धारावीचा परिसर सील करण्यात आला आहे. येथील ४०० लोकांना पोद्दार रुग्णालय आमि कोळी सभागृहात ठेवण्यात आलं आहे. त्यांच्या जेवणाची व्यवस्था पालिकेकडून करण्यात आली असून मुंबईत ड्रोनद्वारे लक्ष्य ठेवलं जात असल्याचंही ते म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

राज्यात आज २३ नवे करोनाग्रस्त, राज्यातील आकडा पोहोचला ८९१ वर

१४ एप्रिलनंतर लॉकडाउन हटणार, असं कुणीही गृहित धरू नये- राजेश टोपे

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?

आणि मुख्यमंत्री ठाकरे यांनी मास्क घालून स्वतःच चालवली गाडी

मिस इंग्लंडचा मुकुट उतरवून ‘ही’ भारतीय सुंदरी बनली डाॅक्टर