हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या बाजारात (BMW i4) इलेक्ट्रिक वाहनांची चलती आहे. एक से बढकर एक इलेक्ट्रिक वाहनं आता मार्केटमध्ये येतायत. त्याच पार्श्वभूमीवर जर्मनीची प्रसिद्ध कार निर्माता कंपनी BMW ने आपली नवीन BMW i4 इलेक्ट्रिक सेडान बाजारात आणली आहे. BMW च्या या इलेक्ट्रिक सेडानची किंमत 69.90 लाख रुपये आहे. आज आपल्या कार रिव्हिव्ह मध्ये जाणून घेऊया या इलेक्ट्रिक कारची खास वैशिष्टये …
गाडीचा लूक-
ही लक्झरी इलेक्ट्रिक सेडान IX SUV प्रमाणेच CLAR आर्किटेक्चरवर डेव्हलप करण्यात आली आहे. या इलेक्ट्रिक सेडानचा (BMW i4) लूक खूपच आकर्षक आहे. समोर, मध्यभागी एक एलईडी हेडलॅम्प आहे. इलेक्ट्रिक कार असल्याने जाळीच्या जागी बॉडी प्लेट देण्यात आली आहे. या गाडीची लांबी ४७८४ मिमी, रुंदी १८५२ मिमी आणि उंची १४४८ मिमी आहे. या इलेक्ट्रिक कारचा व्हीलबेस 2856 मिमी आहे.
590 किमी रेंज- (BMW i4)
BMW च्या या इलेक्ट्रिक सेडानमध्ये 83.9 kWh चा बॅटरी पॅक आहे, एकदा चार्ज केल्यानंतर ही गाडी तब्बल 590 किमी पर्यंत धावू शकते . BMW i4 ची इलेक्ट्रिक मोटर 340bhp पॉवर आणि 430Nm टॉर्क जनरेट करते. या इलेक्ट्रिक सेडानचा टॉप स्पीड 190kmph असून फक्त 5.7 सेकंदात ही गाडी 0-100kmph पर्यंत धावू शकेल.
वैशिष्ट्य –
BMW i4 चे इंटेरिअर आणि केबिनबाबत बोलायचं झाल्यास , याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ब्रँडचा कर्व्ह ड्युअल-स्क्रीन डिस्प्ले… ज्यामध्ये 12.3-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि 14.6-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. या सेडान मध्ये BMW चा लेटेस्ट Drive 8 यूजर इंटरफेस देण्यात आला आहे. कंपनी या डिजिटल इन्फोटेनमेंट सिस्टमसाठी OTA सॉफ्टवेअर अपडेट्सची सुविधा देते. गाडीच्या बाकी फीचर्स मध्ये वायरलेस चार्जिंग, ऑटोमैटिक हवामान नियंत्रण, कूलिंग फंक्शनसह इलेक्ट्रॉनिक फ्रंट सीट्स, इलेक्ट्रिक सनरूफ यांचा समावेश आहे.
हे पण वाचा :
Volvo XC40 Facelift : Volvo XC40 फेसलिफ्ट भारतात लॉन्च; पहा किंमत आणि वैशिष्ट्ये
Audi Q3 2022 : भारतात लॉन्च झाली ऑडी Q3; 7.3 सेकंदात 100 किमीचा वेग पकडते
Kawasaki Z900 : Kawasaki ने लॉन्च केली नवी Bike; पहा किंमत आणि फीचर्स
Mahindra XUV400 : 456 किमी रेंज अन् 150 किमी टॉप स्पीड; Mahindra XUV400 चे दमदार फीचर्स पहाच
HOP OXO Electric Bike : 150 किमी रेंज असलेली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च; पहा किंमत आणि वैशिष्ट्ये