साकोली : हॅलो महाराष्ट्र – भंडारा जिल्ह्यामधील साकोली तालुक्यातील सुंदरी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये शेतशिवारात एका प्रेमी युगुलाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे. कोमल वाघ व कमलेश राऊत असे या प्रेमी युगलाचे नाव आहे.
हि घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. शनिवारी सकाळी सुंदरी येथील शेतशिवारात एकाच झाडाला या दोघांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती समजताच गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर ग्रामस्थांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अधिक चौकशी केली असता मृत कोमल आणि कमलेश हे दोघेही साकोली येथील नम्रता ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी होते. ते बारावी मध्ये शिकत होते. या दोघांनी नेमकी आत्महत्या कोणत्या कारणावरून केली हे अजून समजू शकले नाही. मात्र हि आत्महत्या प्रेम प्रकरणातून झाली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.