सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
कोरोनाची RTPCR चाचणी केलेली नसताना देखील 5 जणांनी जवळ खोटे बोगस अहवाल आढळून आले आहेत. सातारा जिल्हा रुग्णालयातील हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून त्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी सातारा पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली आहे.
सध्या कडक लाॅकडाऊनमुळे जिल्ह्यातील बाहेर जाण्यासाठी तसेच विविध कामासाठी कोरोनाची टेस्ट केल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. अशावेळी सातारा येथील क्रातिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे जिल्हाशल्यचिकित्सक यांनी थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे.
कोरोनाची RTPCR चाचणी केलेली नसताना बोगस अहवाल असल्याचे डाॅ. सुभाष चव्हाण यांना समजताच त्यांनी सातारा पोलीस ठाण्यात दिली तक्रार दाखल दिली आहे. सातारा शहर पोलीस ठाण्यात कोरोनाची RTPCR चाचणी केलेली नसताना बोगस प्रमाणपत्र असणाऱ्या 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिस अधिकारी आण्णासाहेब मांढरे यांनी सांगितले.