BOI Special FD Scheme | आजकाल महागाईचा आणि भविष्याचा विचार करून आर्थिक स्थैर्य मिळवणे खूप गरजेचे असते.यासाठी आपण आत्तापासूनच गुंतवणूक करणे फार गरजेचे आहे. सध्या मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या अनेक पर्याय उपलब्ध आहे. लोक शेअर मार्केट म्युच्युअल फंड बँकेचे सारख्या अनेक गोष्टींमध्ये गुंतवणूक करत असतात. परंतु जर तुम्हाला सुरक्षित गुंतवणूकीचा चांगला पर्याय हवा असेल, तर तुम्ही बँकांच्या FD मध्ये गुंतवणूक करू शकता. कारण बँकांची FD योजनाअत्यंत सुरक्षित आणि चांगला परतावा देणारा गुंतवणुकीची योजना आहे. यासाठी बँक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी एक विशेष एफडी योजना सुरू केली आहे. यावर तुम्हाला खूप चांगला परतावा देखील मिळणार आहे. आता आपण या एफडी योजनेबद्दल माहिती जाणून घेऊया.
बँक ऑफ इंडियाने 400 दिवसांची एक चांगली एक विशेष योजना आणलेली आहे.यावर सर्वात जास्त म्हणजे 8.10% एवढे व्याजदर आकारले जाते. या योजनेसाठी ग्राहक देशातील कोणत्याही ग्राहक शाखेमध्ये जाऊन गुंतवणूक करू शकतात. याशिवाय डिजिटल चैनल इंटरनेट बँकिंगद्वारे देखील तुम्ही गुंतवणूक करू शकता. नवीन दर हे 27 सप्टेंबर 2024 पासून लागू झालेले आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ही गुंतवणूक करू शकता.
किती व्याजदर मिळणार
बँक ऑफ इंडियाच्या या विशेष एफडी योजनेअंतर्गत तुम्ही 3 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. या बँकेद्वारे सुपर जेष्ठ नागरिकांना एडी योजनेवर 8.10% एवढे व्याजदर मिळणार आहे. जेष्ठ नागरिकांना 7.95% व्याजदर मिळेल, तर सामान्य नागरिकांना 7.45% एवढे व्याजदर मिळणार आहेत.
या बँकेने त्यांच्या एक निवेदन जाहीर केलेले आहे. आणि या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की, “देशातील सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ इंडियाने त्यांच्या ग्राहकांना सणासुदीची भेट म्हणून ही योजना आणलेली आहे. या योजनेमध्ये तुम्ही तीन कोटी रुपयांपेक्षा कमी रक्कम गुंतवू शकता. आणि आकर्षक व्याजदर मिळू शकते. ही मुदत ठेव योजना चारशे दिवसांसाठी असणार आहे.
त्यामुळे तुम्ही या बँक ऑफ इंडियाच्या विशेष FD योजननेमध्ये गुंतवणूक करू शकता. तसेच तुम्ही जास्त रकमेची एकच एफडी न करता वेगळ्या रकमेची एफडी करू शकता. त्यामुळे तुम्हाला त्यातून खूप चांगला परतावा मिळेल.