ऍक्शन हिरो अक्षय कुमारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय ; म्हणाला, आता या पुढे चित्रपटात…

Akshay Kumar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेते होऊन गेले. मात्र, ऍक्शन हिरो आणि सुपरस्टार हिरो म्हणून आजही अक्षय कुमारकडे पाहिले जाते. अक्षय कुमार म्हंटल कि सिर्फ नामही काफी है, ज्याच्या नावानेच थिएटरमध्ये गर्दी होते. पण काही काळापासून त्याचे चित्रपट प्रेक्षकांवर आपली जादू टाकण्यात अयशस्वी ठरताना दिसत आहेत. कारण अक्षयचे एकापाठोपाठ एक चार चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले आहेत. नुकताच रिलीज झालेले ‘रक्षाबंधन’ आणि ‘सम्राट पृथ्वीराज’ हे तर बाॅक्स ऑफिसवर चित्रपटाचे बजेट काढण्यातही यशस्वी ठरले नाहीत. त्यामुळे आता अक्षयने यापुढील करणाऱ्या चित्रपटाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

सततच्या फ्लाॅप जाणाऱ्या चित्रपटांमुळे अक्षयवर प्रेक्षकांकडून कमेंट करून निशाना देखील साधला जात आहे. नुकत्याच एका कार्यक्रमात अक्षयने स्वतः घेतलेल्या निर्णयाबाबत माहिती दिली आहे. ” जर तुम्हाला चांगल्या संधी मिळत असतील तर कोणीच काम करणे सोडणार नाही. हा पण मला काही बदल करायचे आहेत, त्यासाठी मी प्रयत्न करतोय.

https://www.instagram.com/reel/CkuaGJdpOjv/?igshid=MDJmNzVkMjY=

कोरोनानंतर सर्वकाही बदलले आहे, प्रेक्षकांनी थिएटरकडे पाठ फिरवली आहे. परंतू यामध्ये प्रेक्षकांची अजिबातच चूक नाहीये. प्रेक्षकांना चित्रपटाशी कसे जोडून ठेवता येईल, यावर मला काम करायचे आहे. मी अगोदर म्हटल्याप्रमाणे कोरोनानंतर खरोखरच काही गोष्टी बदलल्या आहेत. यामुळेच मी माझी फीस कमी करण्याचा विचार करतोय,” असे अक्षयने म्हंटले आहे.

‘हेरा फेरी 3’ मध्ये सहभाग नाही

नव्याने तयार करण्यात येत असलेल्या ‘हेरा फेरी 3’ चित्रपटात जुना अक्षय कुमार या चित्रपटांतून परतेल याची चाहत्यांना प्रतीक्षा होती. पण परेश रावलने ‘हेरा फेरी 3’ मध्ये कार्तिक आर्यन दिसणार असल्याचे सांगितले. हेरा फेरी चित्रपटाबाबत अक्षयने ‘हेरा फेरी’ हा माझ्या आयुष्याचा एक भाग आहे. मला खूप वाईट वाटते की तो पुन्हा तयार होण्यासाठी इतका वेळ गेला. पण मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला वेगळा विचार करावा लागेल. यावेळी मी चित्रपटाच्या स्क्रिप्टवर खूश नव्हतो, म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय घेतला. मी ते करू शकत नाही याचे मला खूप दुःख आहे, परंतु सर्जनशीलतेमुळे मी आता या चित्रपटाचा भाग नाही, असे अक्षयने म्हंटले.