आता तुम्ही गायीच्या शेणावरही टीका करू शकत नाही..; अभिनेता फरहान अख्तरचा मोदी सरकारला टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण देशभरात कोरोनाची दुसरी लाट नुसते थैमान घालत आहे. अशा परिस्थितीत कोरोना महामारीमुळे देशावर आलेली परिस्थिती हाताळण्यात केंद्र सरकार अपुरे पडत असल्याचे अनेकांचे मत आहे. अगदी सर्वसामान्यांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वच सरकारच्या नाकर्तेपणावर बोट ठेवून आहेत. अशातच आता बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरने पुन्हा एकदा केंद्र सरकारवर चांगलाच संताप व्यक्त केला आहे. सरकारी यंत्रणेच्या तोंडावर अगदी गाईचे शेण थापेल, अश्या आशयाचे ट्विट फरहानने केले आहे. हे ट्विटने सध्या चांगलाच जोर धरला आहे. त्याचे अनेको चाहते त्याच्या ट्विटचे समर्थन करताना दिसत आहेत.

अभिनेता फरहान अख्तर नेहमीच देशभरात घडणाऱ्या विविध घटनांवर आपले मत अगदी रोखठोकपणे व्यक्त करीत असतो. याआधीही त्याने कितीदा सरकारच्या चुका दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. पण बऱ्याचवेळा त्याच्या ट्विटमुळे तो ट्रोल होताना दिसतो. यावेळी त्याने पुन्हा एकदा कोरोनाच्या विषयावरून सरकारवर मारक निशाणा साधला आहे. फरहानने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून ट्विट करीत लिहिले आहे कि, प्रथम आपण सरकारवर टीका करू शकत नाही. मग आपण कोणत्याही सरकारी धोरणावर टीका करू शकत नाही. तर कोविडला तोंड देण्यासाठी कोणत्याही धोरणात त्यांच्या कमतरतेवर आपण टीका करू शकत नाही. आता आपण गायीच्या शेणावरही टीका करू शकत नाही. पुढे..??, अश्या खोचट भाषेत फरहानने केंद्र सरकारला टोला लगावला आहे.

देशात सुरु असलेल्या लसीकरणाच्या मोहिमेवरून चांगलाच वाद निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे. दिल्लीमध्ये ‘मोदी जी, आमच्या मुलांच्या लशी परदेशी का पाठवल्या?’ असा प्रश्न विचारणारे पोस्टर लावण्यात आले आहेत. मोदी सरकारवर टीका करणारे हे पोस्टर लावल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी जवळ जवळ २५ जणांना अटक केली आहे. दिल्लीनंतर आता मुंबईतही घाटकोपर परिसरात अश्याच पोस्टरबाजीने केंद्र सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

यासंदर्भात अनेक स्तरांवरून मोदी सरकारच्या या निर्णयाला विरोध करणाऱ्या घणाणत्या टीका होऊ लागल्या आहेत. यात आता फरहान अख्तरने देखील आपला राग ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. हा कोरोना, त्याच्या प्रतिबंधक लशी आणि मोदी सरकार एकंदर काय दिवस दाखवू इच्छिते आहे तेच नेमके असे कळत नाही. पण ‘अच्छे दिन आयेंगे’, जरूर आयेंगे म्हणत, सामान्य माणूस जगण्याचा प्रयत्न करतोय हे मात्र नक्की.

Leave a Comment