Saturday, January 28, 2023

साऊथच्या गाण्यावर बॉलिवूड फिदा! अल्लू अर्जुनच्या ‘बुट्टाबोम्मा’वर थिरकला कार्तिक आर्यन; व्हिडीओ झाला वायरल

- Advertisement -

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन हा सध्या नेपोटीझमचा शिकार म्हणून खूप चर्चेत आहे. एकाहून अधिक चित्रपटातून त्याला सलग हद्दपार केल्याने त्याचे चाहते बॉलिवूड इंडस्ट्रीवर प्रचंड संतापले आहेत. मोठमोठ्या सेलिब्रिटींच्या वर्चस्वामुळे मनोरंजन विश्वात नेपोटीझम बालवतोय आणि स्व मेहनतीवर आभार पाहणाऱ्या कलाकारांना काम दिले जात नाही, असा आरोप चाहते करत आहेत. आता इतक्या गरमीच्या वातावरणात चाहत्यांच थोडं मनोरंजन करून त्यांचा मूड बदलण्याचा पवित्रा कार्तिकने उचलला आणि थेट साऊथच्या गाण्यावर थिरकला. सध्या त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर अतिशय वायरल होत आहे.

https://www.instagram.com/p/CP71jfLjZR3/?utm_source=ig_web_copy_link

- Advertisement -

अभिनेता कार्तिक आर्यनचा हा व्हिडीओ दाक्षिणात्य सुपर स्टायलिश स्टार अल्लू अर्जुनच्या गाण्यावर डान्स करतानाचा आहे. या व्हिडीओमध्ये कार्तिक अल्लू अर्जुनच्या ‘आला वैकुंठापुरमुलु’ या तेलगू चित्रपटातील ‘बुट्टाबोम्मा’ या अत्यंत लोकप्रिय गाण्यावर नाचताना दिसत आहे. अल्लू अर्जुन हा नृत्य शैलीत अतिशय उत्कृष्ट आहे हे सारेज जण जाणतात. मात्र कार्तिक आर्यनसुद्धा कमी नाही. या व्हिडिओत तो अगदी सफाईदारपणे कठीण डान्स स्टेप्स करताना दिसतो आहे. ज्या त्याला खूपच सूट करत आहेत. कार्तिकचा हा डान्स पाहून बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार त्याचे कौतुक करताना थकत नाहीयेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर निश्चितच हे जाणवते, कि तो किती प्रतिभावान कलाकार आहे आणि त्याची बॉलिवूड इंडस्ट्रीला किती गरज आहे.

https://www.instagram.com/p/CPpa-D4Nwui/?utm_source=ig_web_copy_link

हा डान्स व्हिडीओ शेअर करताना कार्तिक आर्यनने आपल्या सोशल मीडिया इंस्टाग्राम अकाऊंटवर लिहिले की, ‘नृत्य असे करा की..? (‘कोणीही पहात नाही,’ हे लिहू नका) या पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये अनेक बॉलिवूड कलाकारांनी कार्तिकचे कौतुक केल्याचे दिसत आहे. बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने यावर टाळ्यांचे इमोजी कमेंट करीत वरूनच कौतुक केले आहे. तर त्याचा मित्र करण ठक्करने कमेंटमध्ये लिहिले, ‘अमेझिंग!.’ या टिप्पणीनंतर करण ठक्कर याने फायर इमोजी देखील पोस्ट केल्या आहेत. याचसोबत अभिनेत्री रकुल प्रीत सिंगही कार्तिकच्या डान्सवर भाळली आहे. रकुलने कमेंटमध्ये लिहिले की, ‘अरे, अरे, अरे..’. तर गायक अरमान मलिक आणि श्रद्धा कपूर यांनीही हार्ट इमोजी पोस्ट करत त्याचे कौतुक केले आहे.

‘बुट्टाबोम्मा’ या गाण्याने अगदी काहीच दिवसांपूर्वी यूट्यूबवर तब्बल ४ मिलिअन लाईक्स पूर्ण केले आहेत. या गाण्यात अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री पूजा हेगडे यांचे रोमँटिक आणि कमाल असे नृत्य पाहायला मिळाले आहे. ज्यानंतर आता कार्तिक आर्यनने या गाण्यावर हटके डान्सचे सादरीकरण केले आहे.

https://twitter.com/PriyaShinde1998/status/1403048626796986373

मात्र तरीही या गाण्यातील अल्लू अर्जुनच्या डान्स स्टेप्सची बरोबरी करणं उफ्फ… कठीणच.. त्यामुळे कार्तिक त्याच्या डान्समध्ये अतिशय अव्वल आहे पण अल्लूला पराभूत करणे त्यालाही जमले नाही. कार्तिकच्या या व्हिडीओवर अनेक संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. हा व्हिडीओ अवघ्या २ तासांतच जवळ जवळ १४ लाखापेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे.