मुंबई | शोले’ चित्रपटाच्या सुर्मा भोपाली या प्रसिद्ध व्यक्तिरेखेसाठी जगभरात ओळखले जाणारे कॉमेडियन जगदीप यांचे वयाच्या 81 व्या वर्षी मुंबईत निधन झाले. ‘शोले’ सिनेमातील त्यांच्या भूमिकेमुळे ते खूप प्रसिद्ध झाले. त्या सिनेमामुळे त्यांना सूरमा भोपाली म्हणून ओळखण्यात आले. हे नाव इतके प्रसिद्ध झाले की, त्यांनी या नावाने एका सिनेमाचे दिग्दर्शन देखील केले. आपल्या हाव भावाने दर्शकांना हसविणाऱ्या जगदीश यांच्या भूमिकेचा अंदाज खूप वेगळाच होता.
शम्मी कपूर यांच्या ब्रम्हचारी या चित्रपटापासून तो विनोदी कलाकार म्हणून ओळखला गेला आणि रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ या चित्रपटात त्यांची भूमिका असलेल्या सूरमा भोपालीने त्यांची कीर्ती घरा घरात गेली. नंतर जगदीपने त्याच नावाचा चित्रपटही दिग्दर्शित केला. चाहते आपल्या या आवडत्या विनोदी कलाकाराला सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहात आहेत.
सोशल मीडियावर #RestInPeace ट्रेंड होत आहे. जगदीपच्या एका चाहत्याने त्यांना श्रद्धांजली म्हणून लिहिले – अजून एक महान अभिनेता आपल्यापासून दूर गेला. दशकांपासून आम्हाला हसवण्याबद्दल जगदीप साहेबांचे आभार. आपण नेहमी आमच्या हृदयात रहाल.