माझ्याबद्दल काही म्हणाल तर नागडं करेन; कंगना भडकली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. अनेक विषयांवर ती आपली रोखठोक मते मांडत असते. नुकताच कंगनाने इस्त्रायल प्रकरणावर भाष्य करणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यानंतर तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, आता कंगनाने देखील या ट्रोलर्सना खडे बोल सुनावले आहेत.

कंगनाने आपल्या इन्स्टाग्रामवर लिहिले, ‘इस्त्राईल कसा बनला हे आपण व्हिडीओमध्ये स्पष्टपणे पाहू शकता. त्यांनी ते इंग्रजांकडून काढून घेतले आणि संयुक्त राष्ट्रांच्या हस्तक्षेपाच्या सहाय्याने ते तयार केले. त्यानंतर त्याच्यावर 6 मुस्लिम राष्ट्रांनी हल्ला केला. त्यानंतर ते त्यांच्यावर सातत्याने हल्ले करून ताब्यात घेत आहेत. कारण जेव्हा आपण युद्ध जिंकता तेव्हाच असे होते.’

पुढे ती म्हणाली,”तुम्ही असं कसं इस्त्रायलला बेकायदेशीर म्हणू शकता.या जगात त्यांचं स्थान नाही का? सर्व जगाला मूर्ख बनवून ठेवलंय. फक्त गुंडगिरी करायची आणि समोरून कुणी केली तर मात्र रडून गोंधळ घालायचा. संपूर्ण जगाला डोक्यावर घ्यायचं. मूर्ख लोकांचा आणि मीडियाचा वापर करून गोंधळ निर्माण करायचा. जरा लाज बाळगा संपूर्ण जगासमोर तुमचा पर्दाफाश झाला आहे आणि मझ्याबद्दल जर बोलाल तर नागडं करून टाकेन.” असं म्हणत कंगनाने ट्रोल करणाऱ्यांची बोलती बंद केलीय.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

 

Leave a Comment