हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – कोरोनाच्या महामारीत अनेक जणांनी आपला जीव गमावला आहे. बॉलीवूडला सुद्धा याचा मोठा धक्का बसला आहे. मागच्या २ वर्षात बॉलिवूडने अनेक मोठे कलाकार गमावले आहेत. जग्गा जासूस, लुडो, प्यार का पंचनामा अशा अनेक चित्रपटांचा युवा एडिटर अजय शर्मा याचा देखील कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. त्याच्या निधनावर अनेक सेलिब्रिटींनी आपले दु:ख व्यक्त केले आहे.
https://twitter.com/editorsuresh/status/1389825199307071489
अजयला कोरोनाची लागण झाली होती. दिल्लीच्या राजीव गांधी सुपर स्पेशालिटी रूग्णालयामध्ये त्याच्यावर मागच्या २ आठवड्यांपासून उपचार सुरु होते. आज पहाटे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अजयच्या माघारी त्याची पत्नी आणि ४ वर्षांचा एक मुलगा आहे.
Devasted is an understatement 💔
We lost Ajay Sharma today.
Not just an incredibly fine editor but an absolute gem of a human being . Nothing makes sense .— Shriya Pilgaonkar (@ShriyaP) May 5, 2021
अजयने बर्फी, ये जवानी है दीवानी, अग्निपथ, काई पो चे, लाईफ इन मेट्रो, द डर्टी पिक्चर या चित्रपटांमध्ये असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले आहे. तसेच त्याने जॉली 1995 या शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शन केले आहे. एडिटींग क्षेत्रात अजयने आपला वेगळा ठसा उमटवला होता. गेल्यावर्षी अॅमेझॉन प्राईमवरची ‘बैंडिट बंदिश’ ही हिट वेबसीरिजसुद्धा अजयनेच एडिट केली होती.