हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bollywood : 2021 साली आपण बॉलीवूड आणि टीव्ही मध्ये काम करणाऱ्या अनेक कलाकारांना गमावले. 2022 वर्षांमध्ये असे काही होणार नाही असे वाटत होते मात्र या वर्षाच्या अवघ्या 5 महिन्यांतच आपण संगीत क्षेत्रातील 7 मोठ्या स्टार्सना गमावले. यामध्ये लता मंगेशकर, बप्पी लाहिरी आणि केके सारख्या मोठ्या नावांचा समावेश होता.
कृष्णकुमार कुननाथ उर्फ के.के यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने नुकतेच निधन झाले. 31 मे रोजी त्याने जगाचा निरोप घेतला. बॉलीवूडमध्ये अनेक सुपरहिट गाणी देणाऱ्या गायकांपैकी केके एक होता. त्याच्या अचानक जाण्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. तो 53 वर्षांचा होता. त्याने अगदी शेवटच्या श्वासापर्यंत संगीत क्षेत्राची सेवा केली. Bollywood
भारताची गान कोकिळा आणि भारतरत्न पुरस्कार विजेत्या लता मंगेशकर यांनी 6 फेब्रुवारी 2022 रोजी वयाच्या 92 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. 1940 ते 2000 च्या दरम्यान कै. लता मंगेशकर यांनी आपल्या आवाजाने लाखो लोकांना भुरळ पाडली. संगीत विश्वातील योगदानामुळे त्यांना ‘नाइटिंगेल ऑफ इंडिया’, ‘क्वीन ऑफ मेलोडी’ आणि ‘व्हॉइस ऑफ इंडिया’ अशीही नावे मिळाली. Bollywood
पार्श्वगायिका आणि गिटार वादक असलेल्या संध्या मुखर्जी यांचेही 15 फेब्रुवारी रोजी निधन झाले. वाढत्या वयातील शारीरिक समस्यांमुळे त्यांचा मृत्यू झाला.
तरसेम सिंग सैनी उर्फ ताज या नावाने ओळखल्या या गायकाने 29 एप्रिल रोजी लंडनमध्ये अखेरचा श्वास घेतला. लोकं त्याला Taz from Stereo Nation असेही म्हणत. त्याने ‘थोडा दारू विच प्यार मिल दे’, ‘नाचेंगे सारी रात’ सारखी अनेक हिट गाणी दिली.
दिग्गज संतूर वादक आणि संगीतकार पंडित शिवकुमार शर्मा यांचे 10 मे रोजी हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. हे संगीत क्षेत्रातील एक मोठे नाव होते. त्यांनी बॉलिवूड मधील अनेक मोठ्या गायकांसोबत काम केले आहे. तसेच त्यांनी हरिप्रसाद चौरसिया यांच्या बरोबर मिळून अनेक हिट गाणी देखील दिली आहेत.Bollywood
15 फेब्रुवारी रोजी ‘डिस्को किंग’ म्हणून ओळखले जाणारे बप्पी लाहिरी यांनी जगाचा निरोप घेतला. ते 69 वर्षांचे होते. बप्पी लाहिरी यांनी फक्त हिंदीच नाही तर बंगाली, तेलुगू, तमिळ, कन्नड, गुजराती चित्रपटात देखील गाणी गायली आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांना संगीतही दिले आहे. बप्पी लाहिरी यांचे जगभरातही लाखो चाहते आहेत. भारतात ‘डिस्को बिट’ लोकप्रिय करण्याचे श्रेय बप्पी लाहिरी यांना जाते. Bollywood
केकेच्या मृत्यूच्या दोनच दिवस आधी पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. ते गायक तर होतेच मात्र त्या बरोबरच त्यांनी राजकारणातही प्रवेश केला होता. सिद्धू मुसेवालाचे यांचे चाहते कॅनडा, यूके आणि अमेरिकेतही आहेत. त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे त्यांच्या चाहत्यांना दु:ख झाले आहे.Bollywood
हे पण वाचा :
‘या’ penny stocks ने गुंतवणूकदारांना एका वर्षात दिला 6,000 टक्के नफा !!!
Fixed deposits : आता ‘या’ स्मॉल फायनान्स बँकेनेही FD वरील व्याजदरात केली वाढ !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात आज वाढ, नवीन दर तपासा